गावाचा इति‍हास

मौजे कणेरीवाडी ग्रामपंचायतीची स्थापना १९८० साली झाली. स्थापनेपूर्वी सुंदराबाई दुध संस्था व‌ प्राथमिक शाळा १९३० साली तुकाराम मारे गुरुजी यांनी स्थापना केली. १९७१ साली पाण्याच्या तीव्र टंचाइर्मुळे पाझ‌र तलाव बांधला गेला. त्याचा फायदा कणेरी, कणेरीवाडी, नेर्ली आदी गावांना झाला. मौजे कणेरीवाडी या गावची लोकसंख्या सन २००१ च्या जनगण‌नेनुसार ३५४१ आहे. गावाचे ग्राम‌दै‍वत मंगुदेवी आहे. प्रत्येक वर्षी या देवीची यात्रा साजरी करणेत येते.

गावामध्ये कणेरीवाडी सेवा संस्‍था, सुंदराबा‍ई दुध्‍ा संस्‍था व ग्रामप‍ंचायत अशा तीन संस्‍था आहेत. गावामध्‍ये प‍ाण्‍याची सोय ही दुध्‍ागंगा नदीतुन एम. आय. डी. सी. मार्फ़त करण्‍यात आली आहे. गावामध्‍ये एकुण्‍ा ५२ बचत गट‍ आहेत व १४ तरुण्‍ा मंडळ‍े आहेत. गावात दरवर्षी हरि‍नाम सप्‍‍ताह साजरा करण्‍यात येतो. गावाम‌ध्ये ३०० लोक‌ वारक‌री सांप्रदायाम‌ध्ये आहेत‌. गावातील सर्व तरुण्‍ा मंडळ‍े मि‍ळ‍ुन गावात समाज प्रबधोनावर नाटी‍का आयोजीत करुन त्‍‍यामधुन‌ मिळ‌णारा निधी शाळ‍ेतील मुलांसाठी ‍शैक्ष्‍ाणिक साहि‍त्‍‍य, खेळ‍ाचे साहि‍त्‍‍य, गरीब मुलांसाठी कप‍डे वाट‍प‍ या साठी वाप‌रला जातो. गावामध्‍ये शिक्षणासाठी प्राथ्‍ामि‍क शाळ‍ा हायस्‍कुलची सोय आहे. गावामध्‍ये नवीन उप‍क्रम म्‍‍हणुन तंट‍ामुक्‍‍त समितीने प्रबोध्‍ान करुन ग्रामप‍ंचायतीच्‍या  माध्‍यमातुन ‘लेक वाचवा अभियान’ या अंतर्गत १ मुलीसाठी रु ५००० व २ मुलीसाठी रु ३००० असे अनुदान जाहीर केले.